सरकारला धडकी भरवणारा धनगर समाजाचा पिवळ वादळ मोर्चा-कांबळे


माजलगांव (प्रतिनिधी ):-धनगर समाज एस.टी.आरक्षण अंमलबजावणी सह विविध मागण्या साठी सरकारला धडकी भरवणारा औरंगाबाद येथे दि.१३ नोव्हेबर रोजी पिवळ वादळ मोर्चाचे आयोजन केले असुन या मोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन जय हनुमान ग्रुप चे संस्थापक सुरेश भाऊ कांबळे यांनी केले.माजलगांव येथिल शासकीय विश्राम गृह येथे दि.३ नोव्हेबर रोजी दुपारी १२ वाजता आयोजित बैठकीत कांबळे बोलत होते. या बैठकीस माजी नगरसेवक पत्रकार तुकाराम येवले ,सराफ व्यापरी संघाचे उपाध्यक्ष नारायणराव सातपुते, संरपच ज्ञानेश्वर सरवदे, संरपच कल्यान कसपटे,मल्हर सेनेचे तालुकाअध्यक्ष विलास नेमाने, अशोक डोणे, संतोष देवकते, पप्पु धरपडे, सतिष डोणे सर,अशोक नवघरे, ग्रा.प.सदस्य बाबा वगरे,पंडीत वगरे विनायक सोनटक्के, सुखदेव मुळे,संपतराव कुंडकर, मंजुळदास कुंडकर , पाराजी कुंडकर, विकास आबुज, गंगाधर गडद े, तात्या पांचाळ,रवि कुराडे , रामेश्वर शिंगाडे,भागवत गायकवाड, उपस्थीत होते. या वेळी पुढे बोलताना कांबळे म्हणाले की धनगर समाजाचा इतिहास खुप पराक्रमी आहे. परंतु इतिहास कारानी तो फार कमी लिहीला आहे.

म्हणुन समाजातील तरूणानी आपला इतिहास समजुन घेतला पाहिजे तरूणानी व्यसना पासुन दुर राहुन शिक्षण क्षेत्रात व उधोग क्षेत्रात आपली ओळख निर्माण कमरा आणि धनगर समाज आरक्षणाची अंमल बजावणीचा प्रश्न गेल्या ७० वर्षा पासुन प्रलंबीत आहे या प्रश्ना साठी समाजातील अनेकानी अपले योगदान दिले आहे परंतु राज्य कर्यिनी आपले मत घेऊन सत्ता भोगल्या प्रशन् सोडवले नाहीत. परंतु आता या प्रश्ना साठी समाजातील तरून पेटुन उठला आहे.राज्यातील सरकारने आपल्याला आरक्षण देण्याचे अश्वासन दिले होते.ते त्यानी पुर्ण करावे आदी मागण्या साठी दि.१३ नोव्हेबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर पिवळ वादळ मोर्चा सरकार ला धडकी भरवणारा मोर्चा चे आयोजन केले आहे .

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget