ऊस पेटल्याने विझविण्यासाठी फडात गेलेल्या शेतकर्‍याचा शॉक लागून मृत्यू


आष्टी, (प्रतिनिधी):- खांबावरील विजेची तार ऊसात पडल्याने लागलेली आग विझवण्यासाठी फडात गेलेल्या शेतकर्‍याला विजतारेचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सकाळी खिळद येथे घडली.
आष्टी तालुक्यातील खिळद येथील बाबासाहेब आश्रुबा गर्जे (वय ३०) यांच्या ऊसाच्या शेतामध्ये काल सकाळी खाबांवरील विजेची तार पडल्याने घर्षण झाले. 

त्यामुळे काही क्षणातच ऊसाने पेट घेतला. त्याच वेळी बाबासाहेब गर्जे यांनी ऊसाला लागलेली आग विझविण्यासाठी फडात उतरुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरील तार दिसुन न आल्याने त्यांचा तारेला स्पर्श झाला. तारेमध्ये विद्युत प्रवाह असल्याने त्यांचा शॉक लागून मृत्यू झाला. परिसरातील शेतकर्‍यांनी त्यांना तात्काळ आष्टी येथील रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget