Breaking News

के.एस.के.महाविद्यालयास नॅक कमिटीच्या मुल्याकंनात ए ग्रेड


बीड (प्रतिनिधी):- येथील सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला दि.०८ व ०९ ऑक्टोबर रोजी नॅक मुल्याकंनात त्रि सदस्यीय समिती मार्फत केलेल्या मूल्यांकनात ए ग्रेड प्राप्त झाला आहे. सदर मूल्याकंन नविन आकृती बंधानूसार झालेले असून नविन आकृतीबंध पहिल्यापेक्षा क्लीष्ट मानला जातो. 


या मध्ये महाविद्यालयाने महाराष्ट्रातील आणि देशातील महाविद्यालयाच्या तुलनेत आपणे पूर्वीचे मानाकंन कायम ठेवून सी.जी.पी.ए.३.११ वरून ३.१८ पर्यत नेला आहे. प्रथम क्रमांक मिळविला असून नॅक कमिटीच्या मुल्याकंनात देखील ए ग्रेड प्राप्त केला आहे. या यशाबद्दल नवगण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास बडगे, सभापती दिनकर कदम यांनी प्राचार्या डॉ.दिपा क्षीरसागर व महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्राध्यापकांचा सत्कार करून कौतूक केले. देशभरातील महाविद्यालयाच्या मुल्याकंनात त्री सदस्यीय कमिटीने दि.०८ व ०९ ऑक्टोबर २०१८ रोजी के.एस.के. महाविद्यालयाला भेट देवून काटेकोरपणे पाहणी केली होती. या मुल्याकंनामध्ये ए ग्रेड प्राप्त झाला आहे.