अंत्यसंस्काराच्या वेळीच आजोबा बसले उठून!


जयपूर: यंदाची दिवाळी खेत्री तालुक्यातील गुर्जर कुटुंबीयांसाठी खास आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या कुटुंबातील मृत घोषित केलेले 95 वर्षांचे आजोबा अंत्यविधी सुरू असताना अचानक उठून बसले. त्यामुळे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

बुद्धराम गुर्जर यांचे निधन झाल्याचे कुटुंबीयांनी घोषित केले. अंत्यविधीपूर्वी घरातील पुरुषांनी मुंडणही केले. त्यानंतर काही विधी उरकून बुद्धराम यांना स्नानासाठी नेण्यात आलें. काही मिनिटांनीच त्यांचा श्‍वासोच्छवास सुरू झाला. ते अचानक जागे झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाइकांना अत्यानंद झाला. बुद्धराम शनिवारी दुपारी बेशुद्ध झाले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाचे वृत्त कुटुंबीयांनी नातेवाइकांना कळविले. अंत्यविधीची सर्व तयारी झाली. घरातील पुरुष सदस्यांनी मुंडणही केले. बुद्धराम यांना आंघोळीसाठी नेण्यात आले. नातेवाइक त्यांना आंघोळ घालत होते. अचानक ते कापायला लागले. ते पाहून नातेवाइकांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने त्यांना पलंगावर नेले. थोड्याच वेळात ते उठून बसले. नातेवाइकांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असता, छातीत दुखू लागल्याने झोपलो होते, असे त्यांनी सांगितले. हा एक प्रकारचा चमत्कारच आहे,’ असे त्यांचा मोठा मुलगा बाळू राम यांनी सांगितले. आमच्यासाठी यंदाची दिवाळी आनंदाची आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर यंदा आमच्या घरात दिवाळी साजरी झाली नसती. या वेळी दिवाळी धूमधडाक्यात साजरी करू, असे त्यांचा धाकटा मुलगा रंजित यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget