किराणा माल देऊन अंध अपंगांना मदत


कुळधरण/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील उद्योजक शहाजी तनपुरे यांच्या वतीने अंध लोकांना दिवाळीनिमित्त किराणामाल देऊन मदत करण्यात आली. मुंबई येथील दोनशे अंध लोकांना त्यांनी ही मदत केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत रोजगारानिमित्त तनपुरे हे मुंबईत स्थायिक झाले. पुढे त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठे यश संपादन केले. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीचा अनुभव घेतलेल्या तनपुरे यांनी गोरगरीब,अंधअपंग लोकांना मदत करण्याची भूमिका कायम ठेवली. त्यांनी मुंबई तसेच कर्जत तालुक्यातील अनेकांना मदतीचा हात दिलेला आहे. गोरगरीब मुलींच्या लग्न समारंभात त्यांच्याकडून जेवणाची व्यवस्था केली विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीही त्यांनी वेळोवेळी मदत केलेली आहे. चालू वर्षी दिवाळीनिमित्त त्यांनी अंध लोकांना एकत्रित करून त्यांनी बोरिवली येथे कार्यक्रमात दिवाळीचा सर्व किराणामाल भेट दिला. तेल ,तूप ,साखर ,रवा ,पोहे, बेसन आदी किराणामाल त्यांनी भेट दिला. गोरगरीब अंध व्यक्तींना ऐन दिवाळीत मोठी मदत मिळाल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले होते. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget