Breaking News

‘स्वाभिमानी’ने ऊस वाहतूक रोखली


कराड (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत जाहीर केल्याप्रमाणे कराड तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर न करता ऊस तोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

 गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कोपर्डे हवेली गावच्या हद्दीत 2 साखर कारखान्यांची ऊस वाहतूक करणारी वाहने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे राज्य कार्यकारणी सदस्य अनिल घराळ यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी अडवली