इंदिरा गांधींनी गोरगरिबापर्यंत योजना पोहोचवण्याचे कार्य केले : विजया कोळसे

बुलडाणा,(प्रतिनिधी): माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात वेगवेगळया प्रकारच्या योजना काढून त्या गरिबांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. तर लोहपुरुष सरदार पटेल यांनी शेतकर्‍यांसाठी मोलाचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन साखळी बुद्रुकच्या सरपंच विजया कोळसे यांनी केले. साखळी बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व सरदार पटेल यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विजया अनिल कोळसे या होत्या. तर तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम बुंधे, कासम सेठ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेश वाघमारे, राजू सरजने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्व प्रथम सरपंच विजया कोळसे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व लोहपुरुष सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अनेक मान्यवरांनी इंदिरा गांधी व सरदार पटेल यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला सुरेश भोरकडे, रहिम सेठ, बब्बू भाई, सै. अन्सार, सरदार शाह, मस्तान भाई, फिरोज खान, अक्रम भाई, मधुकर उगले, दत्ता जाधव, सुनील भागवत, डिगांबर भागवत, राजू गोरे, सदस्य बंडू सोनुने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक रमेश खंडारे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी बाहेर यांनी केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget