मनुवादी सरकार गाडून शाहु-फुले-आंबेडकर विचाराचें सरकार आणा ः छगन भुजबळश्रीगोंदा/प्रतिनिधी
राज्यासह केंद्रातील मनुवादी विचाराचे सरकार असून या मनुवादी सरकारला सन 2019 ला गाडून शाहू, फुले, आंबेडकर विचाराचे सरकार आणा असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी श्रीगोंदे येथे केले. शहरात बुधवारी सायंकाळी भुजबळ यांचा नागरी सत्कार व समता मेळावा पार पडला. यावेळी बोलताना भुजबळ यांनी पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका केली. 

भुजबळ म्हणाले, ’अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सरकारमध्ये आले. मोदींच्या कार्यकाळात काळ्या पैशावाले परदेशात पळून गेले. राष्ट्रीय बँका अडचणीत आल्या. साहेबांचं लग्न फेल, चहाचा धंदा फेल, गुजरात मॉडेल फेल, नोटबंदी फेल, राफेल फेल असे म्हणत दिल्लीच्या साहेबांचं सगळं फेल झालं आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली. पुढे भुजबळ म्हणाले की, ’सत्ताधार्‍यांना मी अडचणीचा ठरेल म्हणून मला आतमध्ये बसवले. खोटेनाटे आरोप करीत माझ्या घरांवर सतरा वेळा धाडी टाकल्या. सरकारच्या कारनाम्यामुळे मला अतिशय वाईट परिस्थितीतुन जावे लागेल. मात्र तरीही मी थांबणार नाही, माझी लढाई सुरूच राहील. यावेळी आ. राहुल जगताप म्हणाले, ’भुजबळ साहेबांच्या माध्यमातून नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. भुजबळ साहेबांनी सर्वसामान्यांना ताकद देण्याची भूमिका घेतल्याने त्यांना अडचणीत आणले, मात्र सरकारला त्यांच्यावरील आरोप सिद्ध करता आला नाही. साहेबांमध्ये नाकर्त्या सरकारला उलथवून टाकण्याचे सामर्थ्य आहे, माजी मंत्री पाचपुते यांनी गावांमध्ये बैठका घेऊन सभेत अडचणी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र पाचपुतेंच्या हाताने भुजबळ साहेबांसारखा सुर्य झाकणार नाही. यावेळी राजेंद्र नागवडे यांनी असे प्रतिपादन केले की, ’भुजबळ साहेब निर्दोष असल्याचा सर्वांना विश्‍वास आहे. राज्यातील सगळा समाज भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभा आहे. तालुक्यातील आमची आघाडी आम्हाला येत्या काळात देखील कायक ठेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मागे ताकद उभे करण्याचे काम करू’.यावेळी काँग्रेसचे अण्णासाहेब शेलार, अंबादास गारुडकर, उमेश परहर, तुकाराम दरेकर, हरिदास शिर्के, संगीता खामकर, शंकर भुजबळ, अर्चना गोरे आदी उपस्थित होते. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget