Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डासारखीच हुबेहुब सराव परीक्षाचे आयोजन


बीड (प्रतिनिधी)- दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यातच भाषा आणि समाजशास्त्र विषयाची तोंडी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ज्ञानरचनावाद यावर आधारित प्रथमच सर्व विषयांची कृतीपत्रिका असणार आहे. यामुळे चिंतेत असलेल्या विद्यार्थी आणि पालकांना दिलासा देण्यासाठी शिक्षणस्फूर्ती अध्ययनमाला पुणे च्या वतीने राज्यातील १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या ५ सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

या पाच परीक्षा म्हणजे बोर्डाची रंगीत तालीम पाच वेळा होणार आहे . राज्यातील अनुभवी व तज्ञ शिक्षकांनी बोर्ड पॅटर्ननुसार सर्व विषयांच्या लेटेस्ट कृतीपत्रिका तयार केल्या असून या कृतीपत्रिका विद्यार्थ्यांना घरी सोडवायला मिळणार आहेत . विद्यार्थी घरी या कृतिपत्रिका सोडवतील व तपासण्यासाठी पुणे कार्यालयात पाठवतील यामुळे विद्यार्थ्यांना योग्य तज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल.

दहावीचे अंतर्गत गुण कमी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना गुण कमी मिळतील की काय अशी भीती व्यक्त होत आहे. यामुळे नवीन अभ्यासक्रम व १०० गुणांची परीक्षा देताना कशी तयारी करावी, हे विद्यार्थी, पालक यांना समजेल’, विद्यार्थ्यांनी सोडविलेली कृतीपत्रिका पुण्यातील अनुभवी शिक्षक यांच्यामार्फत बोर्ड पॅटर्नप्रमाणे बोर्डाच्या नियमानुसार सूचना व दुरुस्तीसह तपासून मिळणार आहे सोबत सर्व विषयांच्या मॉडेल आन्सर पेपर्स विद्यार्थी पालकांना मिळणार आहेत विद्यार्थ्यांच्या चुकांचे निरसन करण्याची यंत्रणाही या व्यवस्थेत आहे.