अटकेतील आरटीआय कार्यकर्त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी


"वेल कम टू  ठाणे" कोडवर्ड वापरून एका बिल्डरकडून एका आरटीआय कार्यकर्त्याने वसुली केल्यानंतर तेच पेपर दुसऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला देऊन सिंडिकेट बनवून वसुली करणाऱ्या ठाण्यातील दोन माजी नगरसेवक आणि आरटीआय कार्यकर्ता सुधीर बर्गे,राजकुमार यादव आणि प्रदीप पाटील याना १५ दिवसाची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी न्यायालयाच्या आदेशानंतर या तिघा आरटीआय कार्यकर्त्यांची ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली. 


प्रख्यात बिल्डर हिरानंदानी यांच्या ठाण्यातील प्रकल्पात बेकायदेशीर बांधकाम आणि गृहसंकुलाच्या बांधकामात सर्व्हिस रोड हडप केला.याबाबत माहितीच्या अधिकारात अर्ज करून धमकावत ५० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी माजी नगरसेवक आरटीआय कार्यकर्ते सुधीर बर्गे, राजकुमार यादव आणि प्रदीप पाटील याना ठाणे कहांडणी विरोधी पथकाने अटक केली. तर मुंब्रा परिसरातील आरटीआय कार्यकर्ता असलेले शौकत मुलाणी आणि अरिफ इराकी यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात पाच लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हा  माँ मुंब्रा देवी कंपनीला बिटकॉन कंपनीद्वारे मिळालेल्या कंत्राटाबाबत महापालिकेच्या विविध विभागात माहितीचा अधिकार टाकून तक्रार मागे घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी शौकत मुलाणी आणि आरिफ इराकी याना अटक करण्यात आली  होती. दरम्यान आरटीआय कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सुधीर बर्गे, राजकुमार यादव आणि प्रदीप पाटील याना आज ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात आले होते. दरम्यान न्यायालयाने यांची ठाणे कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. 

आरटीआय टाकून धमकावत पैशाची मागणी करणाऱ्या दोन माजी नगरसेवक आणि आरटीआय कार्यकर्ता सुधीर बर्गे,राजकुमार यादव आणि प्रदीप पाटील याना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असली तरीही तपासकामी खंडणी विरोधी पथक पुन्हा चौकशीसाठी न्यायालयाच्या परवानगीने त्यांना ताब्यात घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget