कळव्यात दोन विविध घटनेत बेकायदेशीर देशी दारू बाळगणाऱ्या दोघांना अटक


ठाणे : प्रतिनिधी
कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन विविध घटनेत कळवा पोलिसांनी बेकायदेशीर बाळगलेल्या ७२० रुपये किमतीच्या १० बाटल्यासह दोघांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात विनापरवाना बेकायदेशीर देशी मद्याचा साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.


कळवा पारसिक भोगदा जवळ २४ वर्षीय आरोपी रोहित रामावतार सिंग यांच्याकडे देशी दारूचा बेकायदेशीर साठा असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगेश महाजन याना माहिती मिळताच त्यांनी शनिवारी ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी रोहित सिंग याला ३६० रुपयांची देशी दारूच्या पाच बाटल्या आणि १०० रुपयांची रोकडसह वाघोबा नगर शंकर मंदिर समोरील सार्वजनिक रस्त्यावर अटक करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत आरोपी रवींद्र लालूसिंग चौहान(४६) हा देशी दारूच्या पाच बाटल्या व १०० रुपयांच्या रोकडीसह भास्कर नगर मार्केट, मफतलाल कंपाउंडच्या पाठी मागील मोकळ्या जागेत आढळून आला. कळवा पोलिसांनी त्याला अटक करून ३६० रुपयांची देशी दारू हस्तगत केली. या दोन्ही घटनेत कळवा पोलिसांनी ७२० रुपयांची देशी दारू आणि २०० रुपये रोकड हस्तगत केली. दोघांवर कळवा पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget