कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या चुकीने महिलेचा मृत्यू


कुडाळ :  (प्रतिनिधी) : वाई तालुक्यातील यशवंतनगर परिसरातील गीता गणेश जावळे यांचा कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या चूकीमुळे मृत्यू झाला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यामुळे वाई शहरातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार लोकांच्या समोर आला आहे.

वाई तालुक्यातील बावधन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ऑक्टोबर 2018 महिन्यात डॉ. तराळ कडुस्कर, डॉ. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेदरम्यान पोटातील आतड्याला धक्का लागल्याच्या कारणावरून गीता जावळे यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. 10 दिवसाच्या उपचारात चिंताजनक प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथीही प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी पुणे ससून रुग्णालयात उपचार घेत असताना रविवारी जावळे यांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे वाई तालुक्यातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

बावधनमध्ये यापूर्वीर्ही असेच प्रकार घडल्याने बावधनचा आरोग्य विभाग व आरोग्य विभागाचा भोंगळ कारभारही जिल्ह्याच्या पुढे आला आहे. मात्र पुन्हा एकदा याच आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करत असतानाच महिलेचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांकडून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, मृत महिलेला चार लहान मुले आहेत. बावधन आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget