शेवगाव तालुक्यात सुरु असलेली बेकायदेशीर वृक्षतोड थांबविण्याची शिवसेनेची मागणी


शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यात सुरु असलेली बेकायदेशीर वृक्षतोड बंद करण्याची मागणी सुनील जगताप यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे, शेवगाव तालुक्यात बेसुमार वृक्षतोड हे तालुक्यापुढील भविष्यातील मोठे संकट आहे. वृक्ष तोडीला वनविभाग पोलीस अधिकारी व काही स्थानिक लोकांचे ही पाठबळ असल्याने हा धंदा शेवगातालुक्यामध्ये सद्या तेजीत आहे, या वृक्ष थोडी विरुद्ध यापूर्वीही अनेक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी वेळोवेळी तक्रारी निवेदने दिली परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. उलट वन अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष करून आपल्यावर कोणाचा अंकुश नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न 
करत आहेत, रात्री अपरात्री टेम्पो आयशर व 407 टेम्पो यामध्ये लाकडांची मोठ्या प्रमाणात तस्करी करून ताडपत्री व इतर साधन सामुग्री मोठ्या शहरांमध्ये शहरांमध्ये लाकडाची वाहतूक होत आहेत. याकडे वन विभागाचे लक्ष वेधण्याचे काम सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी केले अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याने एकीकडे शासनाने झाडे लावा, झाडे वाचवा अशी वृक्ष संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. 

तर दुसरीकडे विनापरवाना व बेकायदा पद्धतीने तालुक्यात सुरु असलेल्या वृक्ष तोडीमुळे शासनाच्या मोहिमेस खिळ बसत आहे. बेसुमार पद्धतीने सुरु असलेल्या वृक्षतोड व लाकडाच्या तस्करीबाबत वन विभागाच्या जबाबदारांचे लक्ष वेधूनही याबाबत कारवाई होत नसल्याने तालुक्यात सुरु असलेल्या वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येवून राजरोस पद्धतीने सुरु असलेली बेकायदा वृक्षतोड थांबली नाही तर आंदोलन अटळ असल्याचा निर्धार या निवेदनाद्वारे जाहीर करण्यात आला आहे. अविनाश मगरे, सुनील जगताप, एकनाथ कुसळकर, शितल पुरणाळे, रामनाथ काटे, उदय गांगुर्डे, हमीद पठाण, अशोक वाकडे आदींनी शिष्ट मंडळाद्वारे विनोद भामरे यांची भेट घेवून मागणीचे निवेदन दिले. 

तालुक्यामध्ये होत असलेली बेसुमार वृक्षतोड चे मोठे मोठे रॅकेट आहे, त्यामुळे वनाधिकार्‍यांची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे तरच हे वृक्षतोडीचे रॅकेट उध्वस्त होईल अन्यथा शेवगाव तालुक्याचा वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही.
अविनाश मगरे 

झाडांची कत्तल करण्यासाठी कायमस्वरूपी टेम्पोमध्ये कायमस्वरूपी डिजिटल साधन सामुग्री टेम्पो मध्ये बसवून शहराच्या मुख्य रस्त्याने भरधाव वेगात धूळफेक करत जातात याकडे मात्र संबंधित अधिकारी डोळेझाक करतात व तालुक्यात नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय ठरतो

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget