Breaking News

हेक्टरी ५० हजाराची मदत जाहिर करा; पाली सर्कलमधील शेतकर्‍यांची मागणी


बीड,(प्रतिनिधी)- शासनाने दुष्काळ जाहीर केला. परंतू राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी व राज्य आपत्ती निवारण निधी अंतर्गत कोणतीही मदत जाहीर केली नाही. उपाय योजना नाहीत. शासन निर्णयाची अंमलबजावणी नाही. तरी बीड जिल्ह्यात पाण्याअभावी शेतातील पिके करपले आहे. शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

दुष्काळात होरपळलेल्या शेतकर्‍यांना शासनाने हेक्टरी ५० हजाराची मदत द्यावी अशी मागणी पाली सर्कलमधील शेतकर्‍यांमधून होत आहे. शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केलेली आहे. परंतू यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांची पिके पुर्णत: हातातून गेलेली आहेत. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शेतीतील पिकांच्या लागवडीसाठी झालेला खर्च, खते-बियाणे, मशागत यासाठी बँका व खाजगी सावकाराकडून कर्ज काढले आहे.