रेशनकार्ड धारकांच्या तक्रारींची सुनावणी पार पडली


शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील लोळेगाव येथील लक्ष्मी बचत परवाना नंबर 111 या बचत गटामार्फत चालविल्या जाणार्‍या स्वस्त धान्य दुकानाच्या धान्य वाटपाबाबतच्या व रेशन कार्ड धारकांच्या तक्रारींची सुनावणी आज लोळेगाव येथे पार पडली. 

या सुनावणीस शेवगाव चे तहसीलदार विनोद भामरे यांच्या लेखी आदेशानुसार शेवगावच्या पुरवठा विभागाचे पथक प्रमुख नितिन बनसोडे, भातकुडगावचे मंडलाधिकारी सुनील लवांडे, पुरवठा विभागाचे कारकून एस. एम. चिंतामणी, कामगार तलाठी एम.ए. काशीद, सी.ए.गडकर, आर.व्ही.पाटील, ग्रामविकास अधिकारी व्ही.व्ही.घाणमोडे सुनावणीसाठी आले होते, या अधिकार्‍यांनी तक्रारदार व स्वस्त धान्य दुकानदार सुनिता राजेंद्र शिनगारे व अधिकारी यांची संयुक्त सुनावणी घेतली. यावेळी रेशन कार्ड धारकांनी आपल्या कार्डासह सक्षम अधिकार्‍यांसमोर तक्रारी मांडूल्या आापल्या तक्रारींची शहानिशा अधिकार्‍यांसमोर केली, बाबासाहेब पठाडे व ग्रामस्थांनी दि.14 रोजी दिलेल्या लेखी निवेदनाची दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशाने शेवगाव चे तहसीलदार विनोद भामरे यांना संबंधित रेशन दुकानाबाबत चौकशीचे आदेश दिले, दि.24 रोजी लोळेगाव ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन सदर स्वस्त धान्य दुकान सामनगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीला जोडण्यात यावे या ठरावाची प्रत तहसीलदार शेवगाव यांना दिली, या स्वस्त धान्य दुकानाचा विषय संपूर्ण शेवगाव तालुक्यामध्ये सध्या गाजत आहे, शेवगावचे तहसीलदार काय निर्णय देतात आज हे अधिकारी तहसीलदार यांना अहवाल सादर करणार आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget