दिवाळीत पाणी पुरवठा सुरळीत सुरु राहणार !


ठाणे : प्रतिनिधी

दिवाळी सणानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दर बुधवारी व गुरुवारी होणारी पाणी कपात रद्द करण्यात आली असून शनिवार दिनांक 3 नोव्हेंबर 2018 ते 9 नोव्हेंबर 2018 या कालावधीत शटडाऊन घेण्यात येणार नाही अशी माहिती ठाणे महानगर पालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

उल्हास नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनाबाबत जलसंपदा विभागाने चौदा टक्के पाणी कपात करणेकरिता सर्व पाणी उचल संस्थाना कळविले असल्याने स्टेम पाणी पुरवठा कंपनीकडून होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी 24 तास तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यावतीने तर गुरुवारी 24 तास पाणी पुरवठा बंद करण्यात येतो.पण येत्या दिवाळीत नागरिकांची पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून पाणी कपात करता पुरवठा नियमित सुरु राहणार आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget