बिहारमधील जमिनीच्या वादात काकाची हत्या - आरोपी कळव्यात अटक


ठाणे : प्रतिनिधी
बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यात जमिनीच्या वादातून आपल्याच काकाचा खून करून फरार झालेल्या आरोपीस ठाण्यातील कळवा येथून ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शनिवारी अटक केली. जितू शंभुनाथ झा (33) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्यास बिहार पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.

बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यात जमिनीच्या वादातून आपल्याच काकाची हत्या करून फरार झालेला आरोपी जितू झा हा कळवा येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी पोलीस पथकाने सापळा लावून सदर आरोपीस कळव्यातील रेल्वे स्थानक परिसर येथून अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी अट्टल गुन्हेगार असून तो कळवा पोलिसांच्या रेकॉर्ड वरील आरोपी आहे. 20 ऑक्टोबर 2018 रोजी या आरोपीने बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यात जमिनीच्या वादातून आपलाच काका महेश नारायण प्रसाद झा (55) यांचा खून केला होता. त्यानंतर तो फरार झाला. दरम्यान, या खुनामुळे दरभंगा जिल्ह्यात तणावाचे वातावरण पसरले होते. बिहार पोलीस या आरोपीचा कसून शोध घेत होते. परंतु तो त्यांना मिळून येत नव्हता. सदर आरोपीच्या अटकेची माहिती बिहार पोलिसांना देण्यात आली असुन लवकरच या आरोपीला बिहार पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget