Breaking News

महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने लभापाच्या उपशिक्षिका दोमल यांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका सुजाता वसंत दोमल यांना महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. माऊली संकुल सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे उपनेते मा.आ.अनिल राठोड व महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

सुजाता दोमल या रयत शिक्षण संस्थेत गेल्या 14 वर्षापासून उप शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. विद्यालयात ते विविध उपक्रम राबवित असतात. विविध स्पर्धा परिक्षा, प्रज्ञाशोध, स्कॉलरशिप परीक्षेसाठी त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत असते. या परिक्षेत दरवर्षी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत शालेय विद्यार्थी चमकत असतात. विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला वाव मिळण्यासाठी शाळेत त्यांनी विविध कला, कार्यानुभव कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे, विद्यालयाचे मुख्यध्यापक शिवाजी लंके, माध्यमिकचे प्राचार्य अरविंद काकडे आदींसह शालेय शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.