Breaking News

आस्थापना लिपिक शिंदे राम यांची नियुक्ती योग्यच नियमाअनुसार पदोन्नती; विरोधकांचा खोडसाळ पणा


बीड (प्रतिनिधी)- नगर परिषद बीड येथील काल बद्ध पदोन्नती प्रकरण गाजत असतांना या प्रकरणात महाराष्ट्र राज्य नगर परिषद संघटनेच्या वतीने या पदोन्नत्या सेवा जेष्ठता नुसार झाल्या नसल्याचे तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे केली होती. या प्रकरणात आस्थापना लिपिक राम शिंदे यांची पदोन्नती चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप करण्यात आला होता. सफाई कामगार पदावर काम करत असतांना लिपिक पदाची पदोन्नती केली असा आरोप होता. मात्र राम शिंदे यांनी वरिष्ठ लिपिक पदाकरीता आवश्यक ती शैक्षणीक अर्हता धारण केल्यामुळे वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती ची मागणी केली होती. हा प्रस्ताव सर्व साधारण सभे समोर आल्यानंतर प्रकरणारत स्थाया निदेश २३ अ, व २० नुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या नुसार राम शिंदे यांना वरिष्ठ लिपिक या पदावर आयुक्त तथा संचालक यांची स्थायी निदेश २३ अ मध्ये दर्शविल्या प्रमाणे वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती देण्याबाबत निवड समितीने मान्यता दिली आहे.

या प्रकरणात राम शिंदे यांच्या बाबत चुकिच्या पद्धतीने माहिती देण्यात आली, संघटनेच्या भाडणात शिंदे यांना गोवण्यात आले. मुळ प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणारत शिंदे यांनी बाजुमाडत पदोन्नती संदार्भाततील सर्व पुरावे दाखविले आहेत. प्रकरण चुकिच्या पद्धतीने दाखविण्यात आले आहे. असे मत शिंदे यांच्या आहे. सफाई कामगार पदावर काम करत असतांना काल बद्ध पदेन्नतीचा लाभ घेतला आहे. नियम नुसार शैक्षणीक पात्रता पुण झाल्या नंतरच वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत करण्यात आले आहे, कोणत्याही कर्मचार्‍याचे हक्क हिरावून घेतले नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. नगर पालीकेतील काही कर्मचार्‍याना पात्रते अभावि पदोन्नती देण्यात आली नाही. यामुळेच मला या प्रकरणात गोवण्यात येत आहे. मात्र स्थाया समिती कडून प्रस्ताव जिल्हाधिकार्‍याकडे व तेथुन आयुक्त तेच संचालक यांच्या निवड समितीने पदोन्नती केली आहे. या सर्व प्रकरणात वेगळे वळण देण्यात आले असल्याची चर्चा बीड नगर परिषदेत होत आहे.