बाईकची सिमेंट कठड्याला धडक -एक जखमी दोन किरकोळ जखमी


ठाणे : प्रतिनिधी

नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर माजिवडा ब्रिजच्या सुरुवातीलाच असलेल्या सिमेंटच्या कठड्याला धडक देऊन चालकासह तीनजण जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाईक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास राबोडी पोलीस करीत आहेत.


फिर्यादी पोलीस शिपाई स्वप्नील घडशी नेमणूक राबोडी पोलीस ठाणे हे कर्तव्यावर असताना आरोपी प्रतीक अर्जुन पाते रा. शास्त्री नगर, ठाणे हा बाईकवर अन्य मित्रांना बसवून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करून बाईक चालवीत होता. माजिवडा उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच असलेल्या सिमेंटच्या कठड्याला बाईकने धडक दिल्याने चालक पाते हा जखमी झाला तर अन्य मित्र किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात आरोपी प्रतीक पाते याच्या विरोधात वाहन हलगर्जीपणाने नियमांची पायमल्ली करून चालविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget