Breaking News

जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने एकता दौड


जामखेड / प्रतिनिधी 
राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर यूनिटी अर्थात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडला युवक व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. तहसिलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी सहभाग घेतला. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो. देशाची एकात्मता आणि अखंडता टिकवण्यासाठी सरदार पटेल यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. संस्थानांच्या विलीनीकरणात त्यांच्या कणखरपणाचा मोठा वाटा होता. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो.त्यानिमित्ताने जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने एकता दौडचे जामखेड शहरात आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता शहरातील मार्केटयार्ड परिसरातून या दौडला सुरवात झाली. खर्डा चौक परिसरात या दौडचा समारोप झाला. या दौडमध्ये नागरिक व तरूण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.