आरोग्यमय सुखी जीवनासाठी खेळाशिवाय पर्याय नाही -आ.शिवाजी कर्डिले


अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्यमय सुखी जीवनासाठी खेळाशिवाय पर्याय नाही. शाररीक व्याधी व आजार टाळण्यासाठी व्यायाम व मैदानी खेळाची गरज आहे. क्रिकेट या खेळातील शहरी खेळाडूंची मक्तेदारी संपुष्टात येवून, ग्रामीण भागातील उत्कृष्ट खेळाडू पुढे येत आहे. दिवाळी सुट्टीत शहरी व ग्रामीण भागातील युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी निंबळक येथे घेण्यात येणार्‍या दिवाळी क्रिकेट स्पर्धेचे कौतुक करुन, युवकांना मैदानी खेळ खेळण्याचे आवाहन आ.शिवाजी कर्डिले यांनी केले.

नगर तालुक्यातील निंबळक येथे माजी सरपंच कै. संजय लामखडे यांच्या स्मरणार्थ दोस्ती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित 38 व्या दीपावली क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी आ.कर्डिले बोलत होते. यावेळी जि.प. सदस्य माधवराव लामखडे, मा.सरपंच विलास लामखडे, सोसायटी चेअरमन पोपट खामकर, उपसरपंच घनश्याम म्हस्के, अशोक कोरडे, बाळासाहेब गायकवाड, गेणू पाटील कोतकर, भाऊसाहेब गायकवाड, सुभाष कोरडे, राजू रोकडे, सुनिल जाजगे, बाळू कोतकर, संजय गेरंगे, बाळासाहेब कोतकर, बाबासाहेब पगारे, बबन कदम, अविनाश आळंदीकर, दादा घोलप आदींसह खेळाडू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात विलास लामखडे यांनी शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ही स्पर्धा सिझन बॉलवर दिवाळीच्या सुट्टयात घेण्यात येते. स्पर्धेचे हे 38 वे वर्ष असून अनेक उत्कृष्ट खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असल्याचे सांगून, त्यांनी स्पर्धेची माहिती दिली. माधवराव लामखडे यांनी खेळाने मन, शरीर एकाग्र होते. अपयशाने खचून न जाता जिद्द व संयमाने पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा खेळाने मिळते. खेळाडूवृत्ती आत्मसात करणारा युवक जीवनात यशस्वी होत असल्याचे सांगितले. गवंडी समाजाच्या महाराष्ट्र राज्य संघटनेच्या संचालकपदी अविनाश आळंदीकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आ.कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

निंबळकच्या ग्रीन हील स्टेडियम मध्ये रंगणार्‍या दीपावली क्रिकेट स्पर्धेत शहरी व ग्रामीण भागातील 16 संघाना प्रवेश देण्यात आला आहे. अंतिम सामना शहर व ग्रामीणच्या विजयी संघात रंगणार आहे. स्पर्धा सिझन बॉलवर असल्याने उत्कृष्ट संघांचे शानदार प्रदर्शन क्रिकेट रसिकांना पहावयास मिळणार आहे. मर्यादित क्रिकेट संघाचे सामने साखळी पध्दतीने खेळवले जाणार असून प्रथम विजेत्या संघास 21 हजार रुपये रोख व चषक, उपविजेत्या संघास 11 हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह, तृतीय संघास 7 हजार पाचशे रोख स्मृतीचिन्ह व चतुर्थ संघास 5 हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह बक्षिस जाहिर करण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर उत्कृष्ट खेळाडूंना देखील आकर्षक रोख बक्षिस दिले जाणार आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अशोक कळसे, अतुल मगर, केतन लामखडे, अजय लामखडे, सागर चिंधाडे, निलेश दिवटे, सागर कळसे, कृष्णा गुंजाळ, समीर पटेल, एकनाथ सकट आदींसह निंबळकचे युवक परिश्रम घेत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल जाजगे यांनी केले. आभार बाळू कोतकर यांनी मानले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget