बुलडाणा नगर पालिकेत नागरीकांनी फेकला कचरा

काँग्रेसचे नगरसेवक आकाश दळवी यांच्या नेतृत्वात मुख्यधिकार्‍या घेराव बुलडाणा,(प्रतिनिधी)ः बुलडाणा शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नगर पालीकेच्या दुर्लक्षामुळे शहरात दुर्गंधी सुटून नागरीकांच्या आरोगयाला धोका निर्माणा झाला आहे. या घाणीमुळे डेंग्युसारख्या भयाणक आजाराचे रूग्ण आढळत असून पालीकेच्या या निष्क्रीय धोरणाच्या विरोधात प्रभाग क्र. 11 चे काँग्रेसचे नगरसेवक आकाश दळवी यांच्या नेतृत्वात चैतन्यवाडी, विष्णुवाडी या भागातील नागरीकांनी ट्रॅली भरून नालीतील कचरा आणून नगर पालीकेच्या आवारात टाकल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे आज नगर पालिकेची सर्वसाधारण सभा असल्यामुळे शहरातील सर्व नगरसेवक पालिकेत हजर होते. दरम्यान पालीकेत आलेल्या महिला पुरषांनी नगर पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करून मुख्यधिकारी यांना घेराव घातल्याने पालिका प्रशासनाला पोलिसांना पाचारण करावे लागले. या बाबत माहिती अशी की, शहरातील अस्वच्छता तसेच ढासाळत चाललेली स्वच्छता मोहिम सध्या शहरात चर्चेचा विषय झाला आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.त्यातच दिवाळी सारखा महत्वाचा सण असताना शहरात स्वच्छता होत नसल्याचा आरोप काँग्र्रेसचे नगरसेवक आकाश दळवी व माजी नगराध्यक्षा उज्वला काळवाघेयांनी करून पालीका प्रशासन व पदाधिकार्‍यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी व पालिकेला दिवाळी भेट म्हणून चक्क पालिकेत कचारा आणून टाकला. यावेळी नगरसेवक आकाश दळवी व नागरीकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात कुठेच साफसफाईची मोहिम नाही. ठिकठिकाणी घाणीचे उकीरडे पडलेले आहेत. नाल्याची साफ सफाई होत नाही. गणपती व दसरा झाल्यापासून आजपर्यंत कोणत्याही मुख्य चौकांची साफसफाई नाही. याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्या जात आहे. बुलडाणा शहरात जवळपास 14 ते 15 हजार घरे आहेत व 2 ते अडीच हजाराच्या जवळपास व्यवसायीक दुकाने आहेत. यांच्याकडून दिड कोटीचा स्वच्छता कर नगर परिषद दरवर्षी जमा करते. मग हा पैसा जातो कोठे? नगर पालिका सामान्य नागरीकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्य चौकांमध्ये स्वच्छतागृह नाहीत. विशेष म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहाचा विषय फक्त मिटींग पुरता व कागदोपत्रीच ठरतो. अशा अनेक समस्या असून नागरीकांच्या हया समस्या न सुटल्यास यापेक्षाही तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक आकाश दळवी, माजी नगराध्यक्षा उज्वला काळवाघे व नागरीकांनी दिला. दरम्यान नागरीकांनी आणून टाकलेला कचरा पालिकेनी तातडीने जेसीबीव्दारे उचलून फेकला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget