Breaking News

जायभायवाडी घरकुल योजना अपहार प्रकरणः चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा ः जायभाय


जामखेड ता./प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील जायभायवाडी ग्रामपंचायत मार्फत इंदिरा आवास घरकुल वाटपात देण्यात आलेली काय घरकुले व शौचालय लाभार्थी पर्यत गेलीच नाहीत व या घरकुलामध्ये अपहार झाला असल्याची तक्रार माजी सरपंच जयश्री एकनाथ जायभाय यांच्या वतीने वरिष्ठाकडे दाखल करण्यात आली होती ,तक्रारीनंतर तब्बल पाच महिन्या नंतर दि 30 ऑक्टोबर रोजी पंचायत समिती जामखेडच्या वतीने चौकशी समिती पाठवुुन चौकशीचे आदेश गटविकास अधिकार्‍या मार्फत देण्यात आले हाते मात्र तरीही कसलीच चौकशी पुर्ण झाली नसुन घरकुल घोटाळा चौकशी प्रलंबितच राहिली असल्याने पुढील चौकशी त्वरीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जयश्री जायभाय यांच्या वतीने देण्यात आला आहे. 

सन 2002 ते 2007 या कालावधीमध्ये जायभाय वाडी तालुका जामखेड येथील ग्रामपंचायत ला इंदिरा आवास घरकुल योजनेतुन एकुन 66 घरकुलास मंजुरी आली होती. यापैकी 3 इसम मयत असल्याने एकुन 63 लाभार्थी पात्र यादीत समाविष्ट असताना यातील काही लाभाथ्यार्ंना याचा लाभच मिळाला नाही तर काही घरकुले बांधलीच नाहीत तरी त्यावरील निधी मात्र घेतल्याचे कागदोपत्री दाखवले गेले आहे. तसेच बर्‍याच लाभार्थीचे शौचालयही पुर्ण केलेली नाहीत त्यामुळे हा मोठा अपहार असुन याची चौकशी व्हावी यासाठी जयश्री एकनाथ जायभाय यांच्या वतीने नाशिक, अ.नगर व जामखेड पंचायत समितीकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर जामखेड पंचायत समितिचे गटविकास आधिकारी यांनी 14 ग्रामसेवक 3 विस्तारअधिकारी व 4 इंजीनियर अशी 21 जणांची टिम दि. 30 ऑक्टोबर रोजी जायभाय वाडी येथे पाठवली होती. कमिटीने दिवसभर फिरून चौकशी करून माहिती घेतली तरीही कमिटीचे प्रमुख व जामखेड ’पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी. के. माने यांनी आपली चौकशी पुर्ण झाली नसल्याचे सांगुन कुठलीच प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी यांना दिली नसुन चौकशी पुर्ण झाल्यावर व वरीष्ठाच्या आदेशाने पुन्हा नव्याने चौकशी करण्यात येईल असे सांगीतले. मात्र या विषयी ग्रामस्थामधे उलट सुलट चर्चा चालु असुन ग्रामपंचायत कारभार बद्दल उलट सुलट चर्चा केली जात आहे. यावेळी घरकुलापासुन जे वंचित गोरगरीब लाभार्थी राहिले असतील त्यांनी कोणाची वाट पहायची घरकुल येण्यासाठी व ह्या वर शासन काय निर्णय घेत आहेत याच्यावर संपुर्ण लक्ष जायभाय गावचे लागले आहे.