Breaking News

दुर्गबोरी येथे स्वाभिमानीच्या नामफलकाचे अनावरण


डोणगाव,(प्रतिनिधी) मेहकर तालुक्यातील दुर्गबोरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखा नामफलकाचे आणावरण डॉ.ज्ञानेश्‍वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये एका शेतकर्‍यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णु आखरे हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनाध्ये सांगितले की, शेतकर्‍यांच्या घामाच्या दामासाठी शेतकर्‍याच्या मुलांनी आता एकत्र होऊन येणार्‍या काळामध्ये मोठी लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी आपण तयार रहावे. खा. राजु शेट्टी व रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये पुढिल काळामध्ये सरसकट कर्जमाफी साठी मोठे जनआंदोलन छेडण्यात येणार आहे.

यावेळी डॉ. ज्ञानेश्‍वर टाले म्हणाले की, शेतकर्‍यांच्या चळवळीत काम करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा व चळविसाठी स्वतःला झोकुन देऊन निस्वार्थपणे काम करावे. भाजप सरकारच्या चुकिच्या धोरणामुळे शेतकर्‍यांचे बळी जात आहे.याच सरकारच्या विरोधात खा.शेट्टी व रविकांत तुपकर यांच्या आदेशाप्रमाणे राज्यभर आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेऊन या शासनाला दुधाचा भाव वाढिसाठी भाग पाडले. युवकांनी आता घराणेशाहीतील राजकारणाला फाटा दिला पाहीजे.नवयुवकांनी या व्यवस्थेत येऊन शेतकर्‍यांचे प्रश्‍नाला वाचा फोडावी.व शेतकर्‍यांना न्याय देण्याचे कार्य चळवळीच्या माध्यमातून हाती घ्यावे असे मत जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. टाल यांनी मांडले.