कोल्हार-घोटी राज्यमहामार्गावरील खड्डे बुजवा : अल्पसंख्यांक काँग्रेस ; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

संगमनेर/प्रतिनिधी
कोल्हार घोटी महामार्ग हा संगमनेरमधून जात असल्यामुळे या रस्त्यावर मोठया प्रमाणात वरदळ कायम राहते. त्यामुळे तीनबत्ती चौक ते दिल्ली नाका पर्यंत रस्त्यांमध्ये प्रचंड मोठमोठे खड्डे पडले आहे. हे खड्डे तातडीने बुजवण्यात यावे यासाठी संगमनेर तालुका व शहर अल्पसंख्यांक काँग्रेसच्या वतीने खड्यांमध्ये वृक्षारोपन करुन सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोनलकांनी याबाबत निवेदन दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करुन ही हे खड्डे तसेच असल्याने राज्याचे नेते मा.महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याकचे अनिस शेख, जावेद तांबोळी व लाला दायमा यांच्यासह खलीद मिर्झा, अफजल अहमद शेख, शेख तबरेज, मोहम्मद शेख, जुबेर शेख, रियाज शेख, एजन शेख, जावेद तौसिफ मणियार, अमित गुंजाळ, नजीर पठाण, बाळकृष्ण गांडाळ,चेतन नेने, अफसर तांबोळी, फैजान मणियार, इंजमाम शेख, अबदात तांबोळी, दानीश सलीम शेख, शहेबाज अली शेख, टिपू शेख, मलदुम शेख, शेख आयाज, फैजान शेख, शोऐब अस्लम शेख, विजय पवार आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
कोल्हार घोटी हा राज्यमार्ग तालुक्याच्या पश्‍चिमेकडील गावांसाठी महत्वाचा असून रस्त्यावर पडलेल्या अनेक मोठ-मोठ्या खड्यांमुळे वाहतुकीस मोठे अडथळे निर्माण होत आहे. यामुळे या रस्त्यावर अनेक अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यात अनेक जण गंभीर जखमी होवून काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत वेळोवेळी माहिती दिली आहे. मृत्युचा सापळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांच्या आत बुजवले नाही तर संगमनेर काँग्रेस अल्पसंख्यांकांच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. 

यावेळी अनिस शेख म्हणाले कि, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी सणाची लगबग सुरु असून दिवाळी निमित्त संगमनेर शहरात येणार्‍या जाणार्‍या नागरिकांची मोठी वरदळ सुरु आहे. तसेच साखर कारखाना ही सुरु झालेला आहे. कोल्हार घोटी महामार्ग हा संगमनेरमधून जात असल्यामुळे या रस्त्यावर मोठया प्रमाणात वरदळ असून त्वरीत काम सुरु करावे असे ते म्हणाले. तर लाला दायमा म्हणाले कि, तीनबत्ती चौक ते दिल्ली नाका या रस्त्यामध्ये प्रचंड मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत.येथून मागे ही वारंवार तोंडी, लेखी स्वरुपात निवेदन देवूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. ऐन सणासुदीच्या काळात रस्त्यावरील खड्डे बुजवून तातडीने सहकार्य करावे. कारवाई न झाल्यास आंदोलन करू असा खणखणीत इशारा ही त्यांनी दिला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget