दुष्काळावर उपाययोजनांसाठी सुजय विखे यांचा आंदोलनाचा इशारा विखेंकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

कर्जत (प्रतिनिधी) - तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची दाहकता मोठी असून, पाण्याअभावी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. जनावरांच्या चार्‍याचा आणि पाण्याचा प्रश्‍न गंभीर असून दुष्काळाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याने उपाय योजनासाठी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरावेच लागेल, असे सांगत आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. 


तालुक्यातील दिघी येथे डॉ सुजय विखे पाटील यांनी दिघी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकर्‍यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. नुकसान झालेल्या पिकांची त्यांनी पाहणी केली. तालुक्यातील बंद पडलेला पाणीपुरवठा योजनांच्या संदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांनी विखे यांचे लक्ष वेधले. या प्रश्‍नावर सकारात्मक विचार करून राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, प्रवीण घुले, दादासाहेब सोनमाळी, चंदन भिसे, संजय नेवसे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर चारा छावण्या तातडीने सुरू होण्याची गरज व्यक्त करून डॉ. सुजय विखे म्हणाले की, पाण्याच्या टँकरची आवश्यकता आहे. शासनाने गंभीरतेने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे मात्र तसे होत नाही. त्यातच सरकारने मंडळनिहाय दुष्काळ जाहीर केले. मोठा दुष्काळ, मध्यम दुष्काळ असे शासनाचे धोरण आहे. सरकारने दुष्काळी तालुक्यातील गावांची फक्त यादी जाहीर केली पण उपाय योजना जाहीर केल्या नाहीत. अजून शेतकर्‍यांना किती दिवस वेठीस धरणार असा प्रश्‍न उपस्थित करून, दुष्काळी भागातील गावांसाठी उपाय योजना न झाल्यास सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget