Breaking News

दहिगाव-ने येथे आज अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात

शेवगाव/प्रतिनिधी शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील हनुमान मंदिरात आज दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात होत असून सप्ताहात श्री ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण वाचन सोहळा होणार आहे. सप्ताहाचे यंदा 56 वे वर्ष असून परिसरातील सर्वात जुना सप्ताह म्हणून नोंद आहे. लोकनेते मारुतरावजी घुले पाटील व ह. भ. प. बन्सी महाराज तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या सप्ताहाने अर्धे शतक यशस्वीपणे पार केले आहे. वैकुं ठवासी शांताराम महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादाने आज गुरुवर्य कृष्णदेव महाराज काळे यांचे मार्गदर्शनाखाली सप्ताह उत्तरोत्तर प्रगती करत आहे. सप्ताह काळात दैनंदिन रोज पहाटे 4 ते 5 काकडा भजन, 6 ते 7 विष्णुसहस्रनाम, सकाळी 7 ते 10 या वेळेत ज्ञानेश्‍वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, 5 ते 6 हरिपाठ, असे कार्यक्रम होणार असून दैनंदिन 4 ते 5 यावेळेत गणपत महाराज आहेर, संतोष महाराज पवार, नवनाथ महाराज काळे, दे विदास महाराज म्हस्के, अशोक महाराज बोरुडे, राजेंद्र महाराज आसणे, रामेश्‍वर महाराज कंठाळे यांची प्रवचने तर रोज रात्री 8 ते 10 या वेळेत नामवंत कीर्तनकार महंत आदिनाथ महाराज शास्त्री, वाणी भुषण महादेव महाराज माहुरे, ह. भ. प. माधवदास राठी, शिवाजी महाराज देशमुख, उमेश महाराज दशरथे, आसाराम महाराज बडे, महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे कीर्तन होणार असून गुरुवार दिनांक 15 रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत हरी भक्त पारायण ज्ञानेश्‍वर माऊली कदम आळंदी देवाची यांचे काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असून सप्ताहात सांगता प्रसंगी महाप्रसादाची पंगत घुले बंधूं यांचे वतीने आयोजित करण्यात आली आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सप्ताहातील धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजक , ग्रामस्थ व भजनी मंडळ यांचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.