Breaking News

बायपासवर पुन्हा एका तरुणाचा अपघाती मृत्यू


ठाणे :प्रतिनिधी

मुंब्रा बायपासवर हा नजीकच्या काळातला आठवा अपघात आहे. सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात ट्रकच्या धडकेत फडके पद येथील 28 वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. 15 दिवसापूर्वीच बायपासवर ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात दोन तरुण मृत्यू पावले तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटनेला पंधरवडा उलटत नाही तोच पुन्हा मंगळवारी रात्री एका बाईकस्वार तरुणाचा मृत्यू झाला. मुंब्रा बायपासचा आसपास असलेल्या ढाब्यांमुळे धूमस्टाईल तरुणाचा बायपासवर वावर असल्याची चर्चा रंगली आहे. या ढाब्यांवर कारवाईची मागणी मुंब्रा परिसरात आता जोर धरू लागली आहे.


मुंब्रा बायपास रोड नजदिक असलेल्या लालकिल्ला ढाब्यावर मोठ्या प्रमाणात रात्रीच्यावेळी तरुणाच्या घिरट्या घालण्याचे आणि धूमस्टाईलने बाईक चालविण्याचे प्रकार सुरु असतात. मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास डायघर- शीळ रोड के फडके पाडा गावात राहणार अमित गुलाब पाटील(28) हा तरुण धूमस्टाईल बाईक ज्युपिटर घेऊन बायपासवरून फडकेपाडा येथे घरी निघाला होता. तो लालकिल्ला ढाब्याजवळ आल्यानंतर थांबला आणि अज्ञात भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. तर ट्रक चालकाने अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. मुंब्रा बायपासवर दीड महिन्यात 8 तरुणांना जीव गमवावे लागले असल्याची माहिती उपलब्ध आहे.