Breaking News

तडवळेचे पोलीस पाटील बापू ठोंबरे यांचे प्राणीप्रेम; भरकटलेले हरणीचे पाडस वनविभागाकडे


वाठार स्टेशन : तडवळे गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री एक हरणीचे पाडस भरकटलेल्या अवस्थेमध्ये इतरत्र फिरत होते. हे पाडस फिरताना तडवळे गावचे पोलीस पाटील बापू ठोंबरे यांना आढळून आले. त्यांनी हे हरणीचे पाडस धरून ठेवले व वनविभागाचे कर्मचारी लक्ष्मण ढमाळ व संजय लोखंडे यांना बोलावून त्यांच्याकडे सुपूर्त केले. 

तडवळे गावचे पोलीस पाटील बापू ठोंबरे हे मददगार व्यक्ती म्हणून उत्तर कोरेगाव तालुक्यात त्यांची ख्याती आहे. ते वेळोवेळी दुसर्‍यांना मदत करून सामाजिक कार्य करत असतात. ते म्हणतात यातच मला समाधान मिळते. त्याचप्रमाणे न्यायासाठी ते दोन हात करण्यासाठी ही सदैव तयार असतात. अनेकदा अन्यायाला त्यांनी वाचा देखील फोडली आहे. मंगळवारी त्यांचे असेच प्राणीप्रेम पहावयास मिळाले भरकटलेल्या हरणीच्या पडसाला त्यांनी वनविभागाच्या कर्मचार्‍यांकडे सोपविल्याने त्याला जीवदान मिळाले.