शैक्षणिक कारणासाठी विद्यार्थ्यांचे जाती पडताळणी प्रकरणे निपटारा मोहीम


बीड,(प्रतिनिधी)- जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, १ ला मजला, नगररोड बीड या समितीकडे सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना याव्दारे कळविण्यात येते की, शैक्षणिक सर्व अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे. छाननीमध्ये अपूर्ण कागदपत्रे असलेल्या प्रकरणात समितीने त्रुटी नोंदविल्या असून मोठया प्रमाणावर शैक्षणिक प्रकरणे त्रुटीपुर्तते अभावी प्रलंबित आहेत. जाती वैधता प्रमाणपत्रा अभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये व वैधता प्रमाणपत्राबाबत नियमानुसार समितीला वेळेत निर्णय घेता यावा यासाठी शैक्षणिक प्रकरणी त्रुटीपूर्ततेची विशेष मोहिम आयोजित करण्यात येत आहे.

आरक्षित असलेल्या जागेवर व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलेले असून याच विषयावर मागील शैक्षणिक वर्षात सन्मा. उच्च न्यायालयांनी ही बाब अधोरेखित केलेली आहे. त्यामुळे जाती पडताळणीसाठी अर्ज सादर केलेल्या विद्यार्थी व त्यांचे पालक यांना कळविण्यात येते की, आपणास जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळावे यासाठी दिनांक ०१ नोव्हेंबर २०१८ ते ०३ नोव्हेंबर २०१८ असे तीन दिवस शैक्षणिक प्रकरणे निपटारा मोहीम या कार्यालयाकडून राबविण्यात येत आहे. ज्या प्रकरणांमध्ये कागदपत्रे अपूर्ण आहेत. अशांना या कार्यालयाकडून अर्जदाराने अर्जात नमूद केलेल्या दुरध्वनी क्रमांकावर मेसेज पाठविण्यात आलेले आहेत. या विद्यार्थ्यांनी तात्काळ या कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक त्रुटीपुर्तता करावी. या कार्यालयाकडे तयार असलेली व अद्याप वाटप न ालेली वैधता प्रमाणपत्रे सर्व संबंधितांना बीएनपीएल योजने अंतर्गत पोस्टाव्दारे पाठविण्यात आलेली आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget