दुष्काळामुळे भुरट्या चोरांचा धुमाकूळ : पो.नि.पवार


दुष्काळामुळे होणार्‍या रस्तालुट-वाहनचोरीपासून सावध रहा...

जामखेड ता/प्रतिनीधी 
जामखेडचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी जामखेड पोलीस ठाण्यात दुष्काळ निमित्ताने होणार्‍या चोर्‍या रस्तालुट वाहन चोरी होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन पो .नि. पांडुरंग पवार यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे म्हणाले सध्या दुष्काळ आहे आज मुलांना शौक भागवण्यासाठी पुरेसे पैसे घरुन उपलब्ध होत नसल्याने ती मुले कसलाच विचार न करता रस्ता लूट, दुकान फोडी, वाहन चोरी करतात काही वेळेस एखाद्याचा जीव घेण्याला सुद्धा घाबरत नाही. यासाठी दुकानदाराने आपल्या दुकान समोर सीसीटीव्ही कॅमेरे रोडच्या दिशेने ठेवावे म्हणजे चोरी करणारा कॅमेर्‍यात कैद होईल. यावेळी विठ्ठल राऊत म्हणाले आज दुष्काळाचे सावट सर्वत्र पसरले आहे. 
त्यामुळे चोर्‍याचे प्रमाण वाढते आहे यासाठी आपण स्वतः दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच जैन श्रावक संघाचे कांतीलाल कोठारी म्हणाले सोन्याच्या दुकानात जर एकाच वेळी अनोळखी 2/3 महिला लहान मुले घेऊन आल्यास त्यांच्याकडे  कटाक्षाने नजर ठेवा मला याचा 3 वेळेस अनुभव आला आहे. या वेळी पोपट नाना राळेभात म्हणाले आम्हाला पेट्रोल पंपावर फार भीती असते पैसे जादा जमले तरी एखादी पोलीस गाडीची चक्कर मारावी ही विनंती केली. या वेळी पोलीस उपनिरीक्षक निलेश काळे म्हणाले आहुजा यांची रास्ता लुट झाली याचा तपास जोरात चालू आहे आम्ही तपास लावणारच सगळयांनी सतर्क राहावे सध्या पाऊस नसल्याने दुष्काळ परिस्थिती आली आहे. यावेळी कांतीलाल कोठारी, संजय कोठारी, छोटुशेठ आहुजा, अशोक पितळे, अमित चिंतामणी वसंत सानप आणि संजय टेकाळे, रुषीकेश चिंतामणी, अमोल चिंतामणी, पिंटुशेठ बोरा, मंगेश बेदमुथ्था, शुभम जाधव, संकेत ढाळे, आदी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget