एनडीएत आल्यास पवार उपपंतप्रधान आठवले यांचा दावा; काँग्रेसवर कडवट टीका


वर्धा : देशाच्या संसदीय राजकारणातील सर्वांत मुरब्बी नेते शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आल्यास त्यांना उपपंतप्रधान पद मिळू शकते, असा दावा रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी विविध विषयावर भाष्य केले.
 
आठवले म्हणाले, की विरोधकांकडे पंतप्रधानपदासाठी अनेक उमेदवार आहेत. भाजपकडे मोदी आहेत. त्यांच्याशी विरोधकांतील कोणत्याही नेत्याची तुलना होऊ शकत नाही.. पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासारखा उमेदवार आहे. ते पवार यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार नाहीत. त्यामुळे पवार एनडीएमध्ये आल्यास ते उपपंतप्रधान होऊ शकतात.

आठवले यांनी प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमच्या युतीने फारसा फरक पडणार नसल्याचे सांगितले. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे, असे नेहमीचे पालुपद त्यांनी आळवले. आठवले यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. काँग्रेसने संविधानाचा विचार करण्यापेक्षा पक्षाचा विचार करणे आवश्यक आहे. संविधानासाठी मोदी आणि आम्ही सक्षम आहोत. राम मंदिरावर भाष्य करताना त्यांनी सांगितले, की न्यायालयाच्या निर्णयावर पुढील सर्व प्रक्रिया व्हावी. त्याचबरोबर आरक्षण मर्यादा 75 टक्क्यापर्यंत करण्यासाठी कायद्याच्या प्रयत्नात आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget