Breaking News

तलाठ्यासह रायटरला हजार रूपयाची लाच घेतांना पकडले


बीड, (प्रतिनिधी):-लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी एका महिला तलाठ्यासह सहाय्यक असलेल्या रायटरला हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले. ही कारवाई दुपारी उशिरा केसापुरी परभणी येथे करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रकरणात उशिरापर्यंत कार्यवाही सुरु होती. बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी आज दुपारी केसापुरी परभणी येथे एका महिला तलाठ्यासह त्यांचा सहाय्यक असलेल्या रायटरला एक हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले. घुगे नामक महिला तलाठ्यावर ही कारवाई करण्यात आली असुन दुपारी उशिरापर्यंत कार्यवाहीची प्रक्रिया सुरु असल्याने त्या बाबतचा अधिक तपशील उपलब्ध होवू शकला नाही. सदरील कारवाई बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे.