Breaking News

आरक्षण लढ्यातील शाहिदाना खरी श्रद्धांजली-राजेंद्र आमटे


बीड (प्रतिनिधी) मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेकांनी आपले आयुष्य वेचले कै. अण्णासाहेब पाटील यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

मराठा आरक्षण लढ्याची ज्योत कायम तेवत ठेवायचे काम आ.विनायकराव मेटे साहेब यांनी केले.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेकांनी लाठ्या -काढ्या खाल्ल्या,तुरुंगवास भोगला अनेकांनी आपल्या समाजातील भविष्यातील पिढ्यान साठी आरक्षण मिळावे म्हणून आपल्या प्राणाची आहुती दिली.आज मराठा आरक्षण चे विधेयक मंजूर झाले म्हणजे खर्‍या अर्थाने मराठा आरक्षणातील लढ्यात शाहिद झालेल्या समाज बांधलेला खरी श्रद्धांजली अर्पण झाली . या ऐतिहासिक निर्णय मुळे समाजातील गोर -गरीब कष्टकर्‍यांच्या मुलांना शिक्षणाची दार खुली होतील .

आरक्षणाच्या निर्णय मुळे विध्यार्थीना शैक्षणिक सुविधांचा लाभ घेता येईल तसेच बेरोजगार युवकांनी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील .हा निर्णय विध्यार्थी च्या भवितव्यच्या दृष्टीने महत्त्वाचा असून या निर्णय चे विध्यार्थीच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे असे पत्रक शिवसंग्राम विध्यार्थी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या वतीने काढण्यात आले