Breaking News

कराडमध्ये भरधाव कारने चिमुकलीला चिरडले


कराड (प्रतिनिधी) : येथील सोमवार पेठेतील पंताचा कोट परीसरात सई सचिन वाडेकर (वय 6) या चिमुकलीला कारने चिरडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. कार चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळेच चालकाचा ताबा सुटल्याचा दावा नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी केला आहे.

सई वाडेकर ही आपल्या मैत्रिणीसोबत सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घराशेजारील अंबाबाई मंदिर परिसरात रस्त्याकडेला उभी होती. यावेळी अंबाबाई मंदिराजवळ वळण असल्याने मोबाईल बोलत गाडी चालविणार्‍या चालकाचा कारवरील ताबा सुटला. कारने सई हिला जोरदार धडक दिली. 

धडकेनंतर काही अंतरापर्यंत कारने सुईला फरफटत नेल्याचे नागरिकांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, अपघातानंतर कार चालकाला उपचारासाठी कराडच्या सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी शहर पोलीस रूग्णालयात गेले होते.