Breaking News

देऊळगाव राजा व चिखली तालुका दुष्काळ ग्रस्तजाहीर करा; आ.डॉ.खेडेकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी


देऊळगाव राजा,(प्रतिनिधी): गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारल्या मूळे हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप हंगामातील पिके पावसा अभावी वाळून गेली आहे गत काही काळापासून शेतकरी कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करत दरवर्षी अपेक्षा ठेऊन संघर्ष करीत आहे ऐन पीक बहरात असतानाच पावसाणे उघडीप दिल्याने तोंडाशी आलेला घास गमविण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे राज्यसरकारने दुष्काळ ग्रस्त तालुक्याची यादी जाहीर केली आहे.

यामध्ये देऊळगाव राजा व चिखली तालुका वगळण्यात आला आहे. त्यामुळे देऊळगाव राजा व चिखली तालुका दुष्काळ ग्रस्त घोषीत करावा,अशी मागणी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जालना येथे भेट घेऊन मागणी केली आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, ना. बबनराव लोणीकर राज्य मंत्री ना. अर्जुन खोतकर आदी मंडळी उपस्थित होते.