शेवगाव-पाथर्डीच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाहीः आ राजळे


शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या विकास कामाना निधीची कमतरता पडू देणार नाही तसेच शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ.मोनिका राजळे यांनी सांगितले.

शेवगाव तालुक्यातील लखमापुरी येथे विविध विकास कामाचा शुभारंभ आ.राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी भाजपचे बापूसाहेब पाटेकर होते. यावेळी बोलताना आ.राजळे म्हणाल्या की स्वर्गीय राजू राजळे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आपला मानस असून मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. आयुष्यमान भारत योजना, उज्वला गैस योजना, जलसंधारण योजना, रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान विमा योजना आशा शासनाच्या विविध योजनाचे लाभ घेण्याचे आवाहन राजळेंनी केले. आ. राजळे यांच्या हस्ते आमदार स्थानिक विकास निधिमधुन 10.00 लक्ष किमतीचे रस्त्यावर्ती पेव्हींग ब्लॉक बसविणे, 14 वा वित्त आयोग अंतर्गत संपूर्ण गावात पाईप लाईन करणे अंदाजीत रक्कम 1.6लक्ष व 14 वा वित्त आयोगातून दलित वस्तीत पेव्हींग ब्लॉक बसविणे अंदाजित रक्कम 1.00 लक्ष रूपयाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक युवक कार्यकर्ते शरद चाबुकस्वार यांनी केले. चाबुकस्वार यांनी आपल्या प्रास्तविकात लखमापुरी ते खाम पिम्परी रस्त्याचे डांबरीकरण करणे, फुन्दे वस्तिवर सभामंडप करणे, व अंतर्गत बंदिस्त गटर करणे. या कामाची मागणी केली. यावेळी आ. मोनिका ताई राजळे यांच्या हस्ते महाराजस्व अभियान अंतर्गत जातीच्या दाखल्यांचे वाटप ,मागसावर्गीय निधिमधुन पंतप्रधान विमा योजनेचे वाटप, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास लखमापुरीचे पल्लवी चाबुकस्वार, रामजी केसभट, रज्जाक भाई बेग, सुरेश नेमाने, संजय खेडकर, संजीवनी गायकवाड़, दिलीप विखे, गोरख तेलोरे, भारत पातकळ, बंडू कुराळ, पांडुरंग गवते, अशोक कवडे, शाहदेव फुन्दे, बबनराव अम्बाडे ,बबन गावंडे, कमल निर्मळ, नर्मदाबाई अम्बाडे, हरिभाऊ गावंडे, बद्रीनाथ मडके, अंकुश सरोदे, कष्णा सरोदे, दिगम्बर गावंडे, सुरेश जाधव, विष्णु क्षरीहरव, सुभाष निर्मळ, अंकुश बटुले ,अर्जून उगले बालु मातंग, सुखदेव काकडे, शुभम पवार,भाऊराव कंठाले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget