वंजारवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ताराबाई वांढेकर


सोनई प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील वंजारवाडी ग्रामपंचायतीच्या रोटेशनप्रमाणे अलका कैलास वैरागर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर ताराबाई साहेबराव वांढेकर यांची उपसरपंच पदी सर्वनुमाते कार्यलयात निवड करण्यात आली. उपसरपंच पदाची सूचना माजी सरपंच विकास दराडे तर त्यास अनुमोदन म्हणून माजी उपसरपंच रमेश घोरपडे यांनी दिले.

अध्यक्ष स्थानी नानासाहेब दराडे हे होते सदर निवडी बाबत निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक एडके जे.एस.यांनी काम पाहिले. निवड प्रसंगी यशवंत पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष महादेव दराडे,कार्यकर्ते अहिलाजी दराडे, रंगनाथ दराडे, प्रा.अशोक दराडे, पोपटराव डोळे, विद्यमान सरपंच यांचे पती नानासाहेब दराडे, माजी सरपंच कैलास डोळे, सुभाष दराडे, माजी उपसरपंच ज्ञानेश्‍वर दराडे,ग्रा.प.सदस्य, महादेव दराडे,नवनाथ वांढेकर, एकनाथ वांढेकर, महेश दराडे, रामेश्‍वर दराडे, व बाळासाहेब वांढेकर आदींनी परिश्रम घेतले. आभार माजी उपसरपंच विकास दराडे यांनी मानले.तळागाळातील उमेदवाराला संधी दिल्याबद्दल कौतुक होत आहे. या निवडीचे माजी.आ.शंकरराव गडाख,व जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget