ऍट्रोसिटीच्या आरोपातून डॉ.यशवंत राजेभोसले निर्दोष


माजलगाव, (प्रतिनिधी):-माजलगाव शहराती प्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायीक डॉ. यशवंत राजेभोसले यांच्याविरोधात ४ वर्षापुर्वी दाखल झालेला ऍट्रॉसिटी कायद्याखालील गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने रद्द केला आहे. न्या. विभा कंकनवाडी आणि न्या. टी.व्ही. नलावडे यांच्या पिठाने हा निर्णय दिला. २०१४ मध्ये राजाभाऊ घोडे हे डॉ. यशवंत राजेभोसले यांच्या रुग्णालयात एका आजारी नातेवाईकाला भेटायला गेलो असता, डॉ. राजेभोसले यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची फिर्याद राजाभाऊ घोडे यांनी दिली होती

, त्यावरुन माजलगाव शहर पोलीसांनी डॉ. यशवंत राजेभोसले यांच्या विरोधात अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(१०) खाली गुन्हा दाखल केला होता. याला डॉ. राजेभोसलेंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात आव्हान दिले होते.
यावर न्या. विभा कंकनवाडी व न्या. टी.व्ही. नलावडे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावर ’जे डॉक्टर सदर गुन्हयातील फिर्यादीच्या नातेवाईकावर उपचार करतात, ते जातिवाचक शिवीगाळ करतील असे प्रथमदर्शनी पटत नाही, तसेच या गुन्हयातील फिर्यादीची आणि डॉक्टरांची या घटनेपुर्वी ओळख होती आणि त्यामुळे डॉक्टरांना त्याची जात माहित होती हे देखील स्पष्ट होत नाही’. असे मत नोंदवत डॉ. यशवंत राजेभोसले यांच्याविरोधात ४ वर्षापुर्वी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे डॉ. यशवंत राजेभोसले यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget