हरभरा बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात


बुलडाणा,(प्रतिनिधी): डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने तालुक्यातील पोखरी येथे 26 ऑक्टोबर रोजी शेतकर्‍यांसाठी बीज प्रक्रिया महत्त्व व फायदे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य तसेच कृषी विज्ञान केंद्राचे कृषी शास्त्राचे विषय विशेषज्ञ डॉ. भारती आर. तिजारे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्माचे गजानन इंगळे व निक्रा प्रकल्प अंतर्गत वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. कुंतल साटकर व पोखरी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

रायझोबियम, स्फुरद विरघळणारे जिवाणू आणि ट्रायकोडर्मा या जैविक खताची हरभरा पिकास बीज प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. रायझोबियम जिवाणू हरभराच्या झाडाच्या मुळावर गाठीमध्ये सहजीवन जगत असताना हवेतील नेत्र झाडास उपलब्ध करून देतात. यामुळे शेतकर्‍यांचे 10 ते 15 टक्के उत्पादन वाढते. या प्रात्यक्षिकांमुळे शेतकर्‍यांचा रासायनिक खतावरील होणारा खर्च थोडा कमी होईल. शिवाय शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे सांगितले. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे कृषी शास्त्राचे विषय विशेषज्ञ डॉ. भारती आर. तिजारे व वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. कुंतल साटकर यांनी या जैविक खताची सोयाबीन पिकास बीजप्रक्रिया कशी करावी, यांचे प्रत्यक्ष शेतकर्‍यांना दाखवून त्याचे महत्त्व सांगितले. रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी जैविक खताची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशांत औतकर यांनी मोलाचे सहकार्य करून गावातील युवक मंडळीनी परिश्रम घेतले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget