निवृत्त व्हाईस ऍडमिरल मनोहर औटी यांचे निधन


फलटण (प्रतिनिधी) : भारतीय सैन्यदलातील निवृत्त व्हाईस ऍडमिरल मनोहर प्रल्हाद औटी यांचे वयाच्या 92 व्यावर्षी वृध्दापकाळाने (विंचुर्णी ता. फलटण) येथील राहत्या घरी शनिवारी रात्री निधन झाले. रविवारी दुपारी 12.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर विंचुर्णी येथे राहत्या घराच्या परिसरात त्यांच्या शेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी असा परिवार आहे. 

अंत्यसंस्कार प्रसंगी भारतीय सैन्यदलातील निवृत्त कर्नल अमरसिंह पाटणकर, सुबोधकुमार जगदाळे, नौदलामधील निवृत्त अधिकारी भगवान दीक्षीत, तहसीलदार विजय पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रकाश सावंत, कृषीतज्ञ आर.व्ही. निंबाळकर, डॉ. जे. टी.पोळ, विंचुर्णीचे सरपंच रणजित निंबाळकर, आर्किटेक्ट महेंद्र जाधव, सौ. चंदाताई जाधव, डॉ. मंजिरी निंबकर, डॉ. चंदा निंबकर, डॉ. राजवंशी, अमिरखान मेटकरी, निवृत्त नौदल अधिकारी जे. एस. काकडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि औटी कुटुंबिय उपस्थित होते. 

आपल्या सुमारे 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी उत्तम काम केल्याने त्यांना परमविशिष्ट सेवा पदकानेही सन्मानित करण्यात आले होते. सन 1982 मध्ये एशियन गेम्स ऑर्गनायझिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम काम केले.

डॉ. सलीम अली या पक्षी तज्ञांसमवेत त्याचप्रमाणे पर्यावरण विज्ञान तसेच वाघ/सिंहाच्या संरक्षणासाठीही त्यांनी विशेष काम केले. सेवानिवृत्तीनंतर भारतातील समुद्री इतिहास संस्थेची संकल्पना आणि स्थापना त्यांनी केली. विंचुर्णी येथील सेवानिवृत्ती नंतरच्या सुमारे 30 वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीत फलटण शहर व तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रमात सहभागी होवून तेथील सर्वसामान्यांना, शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विशेषत: भारतीय सैन्यदलाविषयी माहिती देवून देशभावना रुजविण्याचे उत्तम काम त्यांनी केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget