देवदर्शनासाठी चाललेल्या दोन साडूंचे अपघाती निधन


नेवासे (प्रतिनिधी)ः दिवाळसणाच्या दिवशी देवाच्या दर्शनासाठी चाललेल्या दोन साडूंवर काळाने घाला घातला. नगर- औरंगाबाद रस्त्यावर प्रवरासंगम शिवारात चाललेल्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या इंडिका कारची धडक बसली. त्यात कमलाकर सखाराम गाडेकर (वय-62 रा. वाळूंज, औरंगाबाद) व पांडुरंग दत्तुजी कडू (वय- 58 रा. सेलगाव ता मेहकर, जि. बुलडाणा) हे दोघे ठार झाले आहेत.

बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर इंडिका चालक फरार झाला आहे. गाडेकर व कडू हे दोघे दुचाकीवरून (क्रमांक एम एच 20- इ क्यू - 6556) नगरक़डे निघाले होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या इंडिका कार ( क्रमांक एम एच-20- बी वाय- 7017) ची जोरदार धडक बसली. गाडेकर व कडू हे दोघे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले होते. त्या वेळी घटनास्थळी आलेल्या अमोल होले व इतरांनी या दोघांना नेवासेफाटा येथील रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget