Breaking News

अबब...एकच वेळी शेळीने दिला पाच पिलांना जन्म!


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील बरकतनगर येथील शेख चांद पाशा यांच्या मालकीच्या एका शेळीने एक दोन तीन नव्हे तर चक्क पाच पिलांना जन्म दिला आहे. त्यात दोन बोकड व तीन पाठिंचा समावेश असुन त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे.

परळी शहरातील बरकतनगर भागातील शेख चॉंद पाशा हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजिविका भागवितात.त्यांची ही बिकट आर्थिक परिस्थिती ओळखूनच तर निसर्गाने त्यांना शेळीच्या माध्यमातून मालामाल करण्याचा निर्णय घेतला नसावा !असा मनात विचार आल्याशिवाय राहात नाही. पाश्या यांच्या मालकीच्या शेळीने शुक्रवारच्या रात्री २.००वाजताच्या सुमारास एक दोन नव्हे तर चक्क पाच पिलांना जन्मं दिला आहे. पाचही पिलांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. .शेळीने पाच पिलांना एकच वेळी जन्म दिल्याची घटना परळीत प्रथमच घडली असल्याने त्यांना पाहण्यासाठी शेख चॉंद पाशा यांच्या घरी बघणारांची रिघ लागत आहे.