Breaking News

दहिगाव ने घुले विद्यालयात शनिवारी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा.


भाविनिमगाव/वार्ताहर
लोकनेते मारुतरावजी घुले पाटिल विद्यालयात शिक्षण घेऊन आपली उत्तरोत्तर प्रगती झालेले व शाळेप्रती आपुलकी असली तरी कामानिमित्त, वेळेअभावी शाळेत येऊ न शकणारे शाळेचे माजी विद्यार्थी. यांची एकमेकांशी ओळख व स्नेहसंबंध कायम जुळावे यासाठी विद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी यांना एकत्र आणण्याहेतुने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. दिवाळी सणानिमित्त व एक स्नेहबंध ऋढ व्हावेत यासाठी स्नेहमेळावा आयोजित केला असून शनिवार 10 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी ठिक 10 वाजता विद्यालयाच्या प्रांगणात होणार्‍या या कार्यक्रमास विद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विद्यालयात शिक्षण घेऊन मोठ्या हुद्द्यावर काम करत असलेल्या व्यक्तीचे विद्यालयातील अनुभव व पुढे जिवनात आलेले बरेवाईट प्रसंग याची उकल या मेळाव्यात होणार असून अनेक वर्षांपासून दुरावलेले वर्गमित्र एकत्र येणार असल्याने एक आगळा वेगळा व प्रेक्षणीय हा स्नेहमेळावा ठरणार असल्याने आमंत्रित सर्व माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

स्नेहबंध निर्माण व्हावे - मा. आ. चंद्रशेखर घुले
आजच्या धकाधकीच्या जीवनात नाती-गोती, मित्र आप्तेष्ट यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. फोन वरचा संपर्क ही कमी होत आहे. त्यामुळे कुठेतरी एकत्र येण्याची, मित्रता, नाती जपण्याची गरज आज निर्माण झाली असून मित्रत्वाचे स्नेहबंध दृढ होऊन ते टिकले पाहिजे या उद्देशाने हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.