Breaking News

ग्रंथालय कर्मचारी 1 डिसेंबर पासून करणार काळ्या फिती लावून निषेध


बुलडाणा,(प्रतिनिधी): राज्यारातील सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये काम करणारे हजारो ग्रंथालय सेवक तथा इतर कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत तोकड्या मानधनावर काम करीत आहेत. याशिवाय त्यांना कुठल्याही प्रकारची सामाजीक सुरक्षा जसे पेन्शन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य वीमा अशा सुविधा मिळत नाहीत. या मागण्यांसाठी सातत्याने ग्रंथालय कर्मचारी आंदोलन करीत असतात. मात्र आजवर मागण्यांची शासनाने म्हणावी तशी दखल न घेतल्याने 1 डिसेंबर पासून सर्व ग्रंथालय सेवक व कर्मचारी बेमुदत काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, राज्यारातील सार्वजनिक ग्रंथालये गेल्या अनेक दशकांपासून वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी तसेच ज्ञानवर्धनाचे काम करीत आहेत. त्यातून समाजात मोठी जनजागृती होत असते. मात्र असे असतानाही या ग्रंथालय चळवळीचा एक महत्वपूर्ण घटक असलेल्या ग्रंथालय सेवक व इतर कर्मचाजयांना आज जेमतेम 3 ते 5 हजार इतक्या तोकड्या मानधनावर काम करावे लागते. हे तोकडे मानधन देखील त्यांना सहा-सहा महिने मिळत नाही.  त्यामुळे आज ग्रंथालय सेवक व कर्मचाजयांच्या परिवाराची वाताहत होत आहे. याशिवाय ग्रंथालय कर्मचाजयांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. आयुष्यभर काम केल्यानंतर निवृत्त होणार्‍या ग्रंथालय कर्मचार्‍यांना कोणतीही मदत मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर गुजराण कसे करावे, असा प्रश्‍न निर्माण होतो. ग्रंथालय कर्मचार्‍यांसाठी आजवर शासनाने वि. स. पागे समिती, प्रा. राव समिती, व्यंकप्पा पत्की समिती या समित्या गठीत केल्या होत्या. त्या समित्यांचे अहवाल  शासनाने स्वीकारले खरे, मात्र त्याची अंमलबाजवणी आजवर देखील केली नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात ग्रंथालय कर्मचाजयांमध्ये रोष व्यक्त होत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता ग्रंथालय कर्मचार्‍यांना किमान 18 हजार रुपये माधन द्यावे, भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्यावा, आरोग्य वीमा आणि पेन्शनचा लाभ द्यावा, सेवाशर्ती लागू कराव्यात, या मागण्यांसाठी आता 1 डिसेंबर पासून राज्यातील हजारो ग्रंथालय कर्मचारी बेमुदत काळ्या फिती लावून कामकाज करीत शासनाचा निषेध करणार आहेत. यानंतर तरी शासनाने त्याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रंथालय कर्मचाजयांनी सहाागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे राज्य अध्यक्ष पंजाबराव गायकवाड, नेमीनाथ सातपुते, जिल्हाध्यक्ष अनंत सातव, जिल्हा सचिव निशिकांत ढवळे यांनी केले आहे.