10 वी च्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणदान लागू करा; शिक्षक भारतीची शासनाकडे मागणी - सुनिल गाडगे


नगर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत दहावीची परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यामापनाचे गुणदान लागू करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे नेते सुनिल गाडगे यांनी शालेय शिक्षण मंत्री, प्रधान सचिव व शिक्षण मंडळाचे सचिव यांच्याकडे एका लेखी निवेदनाव्दारे केली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत माहे मार्च 2019 मध्ये होणार्‍या दहावीच्या परिीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान वगळता बाकी विषयासाठी देण्यात येणारे अंतर्गत मुल्यमापनाचे गुणदान बंद करण्यात आले असून हा निर्णय अतियश अन्यायकारक आहे. यानिर्णयामुळे मार्च 2019मध्ये आयोजित केलेली दहावीची परीक्षा मानसिक दडपणाखाली होणार असल्याचे सुनिल गाडगे यांनी म्हटले आहे. 

शिक्षक भारतीची तातडीची सहविचार सभा शिक्षक भारती कार्यालय नगर येथे शिक्षक नेते सुनिल गाडगे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. यावेळी शिक्षक भारती संघटनेचेकार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, विजय लंके, महिला राज्यप्रतिनिधी शकुंतला वाळुंज, ग्रथपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गाडगे, श्रीकांत गाडगे, शरद धोत्रे, सुनिल जाधव, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, शिवाजी बागल, उपाध्यक्ष शिवाजी सोसे, महिला कार्याध्यक्ष मिनाक्षी सुर्यवंशी, जया गागरे, छाया लष्करे, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सचिव महेश पाडेकर ,कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, सचिव मोहम्मदसमी शेख, जिल्हा महिलाध्यक्षा आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, महानगर महिला अध्यक्षा माधवी भालेराव, बेबीनंदा लांडे, जयश्री ठुबे, मंजुषा गाडेकर, माधुरी सोनार,संध्या गावडे, स्नेहल लगड, मंजुषा शेडगे, लता पठारे, सुरेखा काळे, संगिता धराडे, तृप्ती मगर, सविता शितोळे, नौशाद शेख, वर्षा दरेकर, शारदा लोंढे, साधना शिंदे , माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, शहर जिल्हाध्यक्ष प्रदिप रुपटक्के, अशोक धनवडे, संजय तमनर, जॉन सोनवणे, संभाजी चौधरी, संपत लबडे, नवनाथ घोरपडे, काशिनाथ मते आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा महिलाध्यक्षा आशा मगर म्हणाल्या कि, सीबीएसई, आयसीसी, आयबीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापनाचे गुणदान कमी करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना दहावीच्या परिक्षेत गुणांची टक्केवारी जास्त राहील आणि 2019-20 या शैक्षणिक वर्षात अकरावीच्या प्रवेशाच्या वेळी त्यांना प्राधान्याने प्रवेश मिळेल. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत दहावीची परिक्षा देणारे विद्यार्थी मागे पडतील. त्यामुळे त्यांच्यावर फार मोठा अन्याय होईल. या विद्यार्थ्यांना सर्व विषयामध्ये पूर्वीप्रमाणे गुणदान लागू करावे. अशी मागणी शासनाकडे लावुन धरण्यात आली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget