Breaking News

अनुराधा फार्मसी महाविद्यालयाचे 11 विद्यार्थी गुणवत्ता यादीत


चिखली,(प्रतिनिधी)- येथील अनुुराधा कॉलेज ऑफ फार्मसीच्या तब्बल अकरा विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादित करीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकण्याचा बहुमान प्राप्त केला असून महाविद्यालयाने आपली शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली आहे. गुणवत्ता यादीतील 19 मेरीटपैकी 11 विद्यार्थी हे केवळ अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी चे आहेत ही उल्लेखनीय बाब आहे. या निकालाने महाविद्यालयाच्या पुन्हा महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


औषधनिर्माणशास्त्र विषयातील नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जाहीर केलेल्या एकूण दहा मेरीटपैकी तब्बल पाच मेरीट अनुराधा फार्मसी पदवी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. विद्यापीठ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये बी. फार्म पदवी मधून मेरीट गुणवत्ता यादीमधून दुसरे स्थान कु अंकीता प्रदीप डुकरे हिने प्राप्त केले.गुणवत्ता यादीमधून तिसरे स्थान सागर गजानन भोंडेकर याने पटकावले. चौथे स्थान सुचिता गजानन पंडीत हिने पटकावले. सहावे स्थान वैभव गजानन हाडे याने पटकावले.आठवे स्थान श्रद्धा वामनराव जाधव हिने पटकावले आहे. एम. फार्म पदव्युत्तर पदवी मधील फार्माकोलॉजी, फार्मास्युटीक्स, क्वॉलिटी अशुरन्स या विद्याशाखेमधुन अमरावती विद्यापीठाच्या वतीने प्रत्येकी तीन मेरीट काढण्यात आले असून तीनही विद्याशाखेत तीनपैकी दोन मेरीट येण्याचा बहुमान अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यानी प्राप्त केला आहे. तीन शाखेतील 9 मेरीटपैकी 6 मेरीट अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीचे असून हे उत्तुंग यश आहे. एम फार्म फार्माकोलॉजी पदव्युत्तर पदवी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिले स्थान पटकावण्याचा बहुमान योगेश शिवदास मिसाळ याने मिळवला. दुसरे स्थान निरंजन जनार्दन पवार याने पटकावले.. एम फार्म क्वॉलिटी अशरन्स पदव्युत्तर पदवी मध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमधून पहिले स्थान प्रतीक्षा विवेकानंद राठी हिने मिळवले. तिसरे स्थान रोशनी बाळासाहेब देशमुख हिने मिळवले. एम फार्म फार्मास्युटीक्स पदव्युत्तर पदवीमध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमधून दुसरे स्थान वैशाली ज्ञानेश्‍वर देशमाने हिने मिळवले. तिसरे स्थान कोमल विश्‍वासराव मोरे हिने पटकावले. गुणवत्ता यादीत विद्यार्थी झकळल्याबद्दल व विशेष यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे, संस्थेचे सचिव तथा आ. राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ व्ही. आर. यादव, संस्थेचे विश्‍वस्त सिद्धेश्‍वर वानेरे, सलीमोद्दीन काझी, आत्माराम देशमाने, अनंतराव सराफ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी, प्राचार्य डॉ. आर. एच. काळे, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्याचा सत्कार केला.