Breaking News

कराडमध्ये काँग्रेसचा 134 वा वर्धापनदिन साजरा


कराड (प्रतिनिधी) : कराड शहर काँग्रेस आणि सातारा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग यांच्यावतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा 134 वा वर्धापनदिन नुकताच कराडमध्ये साजरा करण्यात आला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या घटनेनुसार राजकीय, आर्थिक, सामाजिक हक्कात समानता व जागतिक शांतता हेच काँग्रेस पक्षाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार दि. 28 डिसेंबरला काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त महात्मा गांधी यांना वंदन करून वर्धापनदिनाचा केक कापण्यात आला, तसेच नागरीकांना पेढेही वाटण्यात आले. देशातील जनतेला आर्थिक व सामाजिक स्थैर्य मिळावे यासाठी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून काम करत आहे आणि यापुढेसुद्धा हा पक्ष सामाजिक बांधिलकी जपून समाजामध्ये सलोखा व शांतता निर्माण करणेसाठी झटत राहील, असे मनोगत काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष जाकीर पठाण यांनी या वेळी व्यक्त केले.

कार्यक्रमास काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते उत्तम दसवंत, डॉ. गडकरी, तसेच शहर काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सचिव आदिल मोमीन, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, युवक काँग्रेसचे प्रताप पाटील, युवा नेते धनराज शिंदे, विशाल पाटील, अभिजित पवार, मकसूद मोमीन, बिलाल आतार, इम्रानभाई मुजावर, समीर तुपे, जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे जनरल सेक्रेटरी अमीर आतार, आदींसह प्रमुख कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.