Breaking News

महाबळेश्‍वरला 15 झोपड्या खाक


हाबळेश्‍वर (प्रतिनिधी) : येथील प्राथमिक शाळेच्या मैदानामागील बाजूस असणार्‍या एका झोपडीत अचानक गॅस सिलींडरचा स्फोट झाल्याने झोपडीस लागलेल्या आगीने लगतच्या अन्य झापड्याही पेटल्या. या भीषण अग्नीसंहारात 15 झोपड्या भस्मसात झाल्या.

सिलींडरच्या स्फोटाने लागलेल्या आगीवेळी झोपडीत कोणीही नसल्याने हा प्रकार लवकर उघडकीस आला नाही. त्यातूनच आगीने रौद्र रूप धारण केले. परिसरातील राहिवाश्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचा लोंढा वाढतच गेला. आगीवर नियंत्रण मिळवत असतानाच झोपडीतील सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी भडकली.झोपड्यांना आग लागल्याची बातमी वार्‍यासारखी शहरात पसरली. त्यामुळे लोकांच्या गर्दीचे लोंढेच्या लोंढे तेथे दाखल झाले. महाबळेश्‍वर नगरपालिकेच्या अग्निशमक दलाची गाडीही दूर्घटनास्थळी पोहोचली. अग्निशमक दलाच्या जवानांबरोबरच महाबळेश्‍वरातील तरुणांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या शर्थीने मदतकार्य केले. दूर्घटनास्थळी महाबळेश्‍वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पाहणी करून गेल्या.